शब्द शब्द जोडताना ......काय आहे हे ...... तस तर नुसती शब्दांची एक चळत आहे ज्याला अर्थाच वीण घालायचा प्रयत्न आहे .... म्हटलं तर हे प्रसंग आहेत ... काही घडलेले काही न घडलेले ....काही कथा आहेत ...... त्याला चवदार बनवायला त्यात थोडा मसाला ही आहे ..... कधी श्वास लयीत आले की शब्द स्वताहून नादावतात .... अशा नादावल्या शब्दांची मांडणी आहे ...... या लिखाणाला गद्य पद्य अस काही म्हणावसं वाटत नाही ..... मुळात याला कशाचाही काही निश्चित धरबंध नाही .......... हो अगदी कधी कधी अर्थाचाही पत्ता नसेल ...... पण अर्थ हवा असा आग्रह लिहिणार्याचा ही नाही ......... भेटत राहू ......!!!!
VERY NICE
ReplyDelete