हा कोल्हे म्हणजे माझ्या शेजारच्या तुकडीतला म्हणजे 'क' तुकडीतला एक आडदांड मुलगा. उंची असेल साधारण ६.२ वजन ८६ kg अस्वलासारखे अंगभर केस .या कोल्हेची मान कानापासूनच चालू होत असे, पिवळे डोळे आणि दात, केस वाढलेले पण न विंचरलेले असा हा कोल्हे माझ्या सोबत कोलेज ला होता. आशा मुलासोबत मैत्री काय साधी ओळखही ठेवणं मला आवडल नसत पण आमची ओळख झालीच.
कोलेजच्या (कोलेज कसलं शाळाच ती आम्हाला ११वि ला पण युनिफोर्म होता ) सूचना फलकावर कुस्ती चा सराव चालू होत असल्याची सूचना लागली आणि माझे नव्याने व्यायाम करून फुगत असलेले बाहू कुस्ती साठी आसुसले ,म्हंटला चला हे हि करून पाहू. कोलेजात कुस्ती साठी मेट नव्हता म्हणून कोलेजच्या मागे एका गवताळ भागात आम्ही एकत्र जमलो तिथे गेल्यावर मला कळलं कि इथे सगळ्यात बारीक मीच आहे सगळेच आडदांड आणि राकट तिथेच या कोल्हे ला नीट पाहता आलं तो जमलेल्या सगळ्यां मध्ये दणकट दिसत होता आम्ही १० -१२ जण असू तिथे. आमची २-२ च्या गटात विभागणी केली गेली माझी उंची ६ फुट असल्याने माझ्या किरकोळ शरीरा कडे दुर्लक्ष करून सरांनी मला कोल्हे सोबत उभं केलं .... मला तर त्याच क्षणी माझी कुस्तीतील प्रगती दिसू लागली कोल्हे माझ्या कडे पाहून अगदीच तुच्छता पूर्वक हसला. सरांनी त्या दिवशी व्यायाम करून घेतला आणि एकच डाव शिकवला सर्व जोड्या तो डाव आजमावून पाहू लागल्या या कोल्हे ने मला अगदीच खिळखिळा करून सोडलं अशी आमची पहिली ओळख.
पुढे कोलेज मध्ये हा कोल्हे जेव्हा संधी मिळेल तेव्हा मला चिडवत असे आणि प्रत्येक संध्याकाळी मला मातीत तीम्बत असे मी काही करू शकत नव्हतो एक तर त्याला सरळ टक्कर देण्याची ताकद माझ्यात नव्हती आणि कुस्तीत त्याला हलवण देखील माझ्यासाठी कष्टसाध्य असे, तरी एक होत त्याच्या कडून मी सहजी मातही खात नसे माझा बचाव चांगला होता अन मी कोल्हे पेक्षा बराच चपळ होतो तस मी कधीच कोल्हेला हरवलं नव्हतं तरी कोल्हेही मला हरवू शकत नाही यासाठी तर सर त्याची टिंगल करत आणि मला शाबासकी मिळे याने कोल्हे माझ्यावर अजूनच चिडून हमला करू लागे अशात त्याच्या कडून जास्त चुका होत मग तो आजून जास्त चिडे आणि मला कुस्ती संपल्यावर त्याची शाररीक मस्ती सहन करावी लागे
अस सगळ असलं तरी मला कुस्तीत मजा येत होती. लंगोट वर फक्त लहानशी नीकर घालून उघड्या अंगाने मातीत खेळण एक वेगळा राकट अनुभव होता माझं शरीर अजून पिळदार होत गेलं पुन्हा आमचं कोलेज ही टग्या मुलांसाठी प्रसिद्ध होतं आठवड्यातून एकदा तरी कोणीतरी दुसर्याला बाहेरून मुलं बोलावून मारत असे त्यामुळे अशांसोबत राहताना एक वेगळा आत्मविश्वास या कुस्ती च्या सरावा मुळे माझ्यात आला.
माझी अभ्यासातली गती ही इतर मुलाच्या तुलनेत उत्तम होती म्हणजे मी चक्क मुलांमधून पहिला येत असे वरून मी कविता करतो, लेख लिहीतो यामुळे मुलींमध्ये ही मी प्रसिद्ध झालो अनेक मुली स्वताहून माझ्याशी मैत्री करायला येत ही गोष्ट माझ्यासाठी नवी असली तरी मला जाम आनंद त्या काळात होत होता.याच सगळ्यात माझी पूजा नावाच्या मुली सोबत मैत्री झाली ही पूजा कोल्हेच्याच तुकडीत होती आम्ही बर्याचदा मधल्या सुट्टीत थोडं बोलत असू तसच कोलेज संपल्यावर ही ती मला भेटून जात असे.
याच सुमारास तो ऐतिहासिक प्रसंग घडला. कुस्तीच्या स्पर्धा जवळ आल्या मुळे आम्ही सराव वाढवला होता सरांनी एक ट्रक भर रेती मागवली आणि कोलेजच्या इमारती समोरच ओतली आमच्या कोलेज ची इमारत इंग्रजी सी या अक्षर सारखी आणि समोरून व्हरांडा याच्या अगदी मध्यभागी सरांनी आमचा आखाडा बनवला आणि कोलेज संपायच्या १ तास अगोदरच आम्हाला सरावाला बोलावलं. कोलेजच्या मागे छोट्या नीकर वर सराव करायला काही वाटत नसे पण हे असं कोलेजच्या मध्य भागी जरा जास्तच मोकळं वाटू लागलं मला. कोल्हे तर भारीच उत्साहात आला त्याला असंही सगळ्यांसमोर माझी जिरवायला मजा येत असे आता तर आयतीच संधी चालून आली मग काय त्याला धीर धरवेना पहिला तास तर व्यायामातच गेला कोलेज सुटलं तसे सगळे जण आमच्या आखाड्या भोवती गोळा झाले बरीच गर्दी जमली व्हरांड्यातून मुली सुद्धा आमची मजा बघू लागल्या आता प्रत्यक्ष कुस्तीला सुरवात झाली मला तर सगळ्यांसमोर असं उघडा उभा राहण्याची ही लाज वाटत होती त्यात हा कोल्हे उत्साहात आलेला मनात म्हटलं आज लाज राखली गेली तरी मिळवलं कोल्हेने मला फिरवायला सुरवात केली नेहमी पेक्षा जास्त ताकदीने तो चाल करू लागला पण मीही त्याला काही दाद लागू देत नव्हतो हळू हळू जमलेल्या मुलांनी आम्हाला चीतवायला सुरवात केली मुलींमधून सुद्धा आईग, दमला बिचारा असे शब्द कानी येऊ लागले कोल्हेला हेच हवा होतं त्याने सगळ्या ताकदीने माझ्यावर चाल केली आणि चक्क तो चुकला आणि मला धोबीची पकड मिळाली अशा वेळी काहीच विचार होत नसतो मी त्याला दणदणीत आपटला कोल्हे माझ्या पायाशी पाठीवर उताणा पडलाय मी त्याच्या डोक्या जवळ उभा आहे सगळे आवाज थोडावेळ बंद पडल्यासारखे वाटले इतका वेळ चालू असलेली झटापट अचानकच संपली आणि ...आणि ..... मी जिंकलो की...!.. जमलेल्या सगळ्यांनी एकाच जल्लोष केला सरांनी येऊन मला शाबासकी दिली वर व्हरांड्या कडूनही हसण्याचे आवाज येत होते तिथे पाहावंसं फार वाटत होतं पण मी ते टाळल. कोल्हे ला ही जरा वेळच लागला काय झाला ते कळायला मी कोल्हेकडे पाहिलं तर तो रागाने फुरफुरत होता आता या पुढे कस होणार याची थोडी चिंताही वाटून गेली मला कारण त्याला ज्या प्रमाणात राग आला होता त्यावरून तरी तो मला नक्कीच कपडे फाटेस्तोवर मारणार आस वाटत होत पण मी ही थोड्या शिताफीने त्या दिवशी लवकर सटकलो. दुसर्या दिवशी कोलेज भर कालच्या कुस्तीचीच चर्चा होती माझ्या अनेक मित्रांनी येऊन माझं कौतुक केलं. माझं कुस्ती खेळणं अनेकांना माहित नव्हतं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं अनेक शिक्षकांनीही कालचा माझं खेळ पाहिला होता त्यांनीही माझं विशेष उल्लेख केला आणि अनेक नाजूक नजरा अंगभर धावून जाताना एकमेकीना मुद्दामून सांगत होत्या हाच तो कालचा ... काय सांगू स्वर्गा पासून मी मी दोन बोटांवर होतो.
पूजाने तर माझा हात मिळवून अभिनंदन केलं जणू मी कुठला तरी कुस्तीचा मोठा फड जिंकून आलो होतो आणि झालं ज्याची आता पर्यंत मला आठवणच झाली नाही ते आरिष्ट समोर येऊन धडकल कोल्हे कालच्या इतकाच रागात माझ्या समोर येऊन उभा राहिला त्याने सरळ माझी कॉलर पकडली आणि विचारलं की माझं आणि पूजाच काय चालू आहे म्हणून एव्हाना पूजा निघून गेली होती मला कळेना हा अचानक पूजा बद्दल का विचारायला लागला ते नंतर त्याने बराच शिवीगाळ करत मला तिच्या पासून लांब राहायला सांगितलं आणि त्याच वेळी बागुल सर मागाहून आले ते आले म्हणून माझी कॉलर त्याच्या हातून सुटली पण जाता जाता त्याने मला आज कोलेज बाहेर भेट म्हणून सांगितलं.
कालच्या जिंकण्याचा सगळा आनंद कुठल्या कुठे निघून गेला आता हा कॉलेजच्या बाहेर माझी काय अवस्था करणार याची तर मला कल्पनाही करवत नव्हती पळून जाण्याचा उपयोग नव्हतं आज ना उद्या त्याची माझी गाठ पडणारच होती काय करावं ते कळेना, शेवटी मी ही माझ्या काही मित्रांना हे सगळं सांगितलं तेव्हा कोल्हे पूजाच्या मागे लागलाय हे कळलं. त्याला आधीच माझ्यावर पूजला घेऊन राग होता त्यात काल व्हरांड्यात पूजाला मला पाठींबा देताना पाहून हा पहेलवान कोल्हे चावताललाच आणि आज मला मारून तो हे सांगणार होता कि पूजा पासून लांब रहा. आता काय सांगावं... न मार खाता सूद्धा मला हे कळलं होतं पण माझं तोंड फोडल्या शिवाय हा कोल्हे शांत होण्याचं काही लक्षण दिसत नव्हतं शेवटी काही मित्रांची मिन्नातवारी करून त्यांना माझ्या सोबत राहण्यास सांगितलं. कोल्हे ने आतापर्यंत अनेकांशी भांडण मारामाऱ्या केल्या होत्या प्रत्येक वेळी तो एकटाच मारत असे कोणी मित्र सोबत नसत त्याच्या तर आज जर माझ्या सोबत ५ -६ जण बघेल तर कदाचित मार न देता बोलण्यावरच निभाऊन नेता येईल असा माझं कयास होता.
अखेरीस ती वेळ आलीच कॉलेज सुटलं माझ्या बरोबर येण्यास तयार झालेल्या ६ जणांपैकी केवळ २ शिल्लक राहिले बाकीचे पळून गेले. आता काय आहेत त्यांची हिम्मत टिकवत मी कॉलेज च्या गेट जवळ आलो कोल्हे समोरच उभा होता रस्ता ओलांडून तो माझ्या कडे येऊ लागला जस जसा तो जवळ येत होता तसा काही वेगळंच वाटत होता एकतर कोल्हे खूप थकल्या सारखा दिसत होता. शर्टचा खिसा फाटून लटकत होता आणि चेहऱ्यावर अजिबात राग दिसत नव्हता तर एक केवीलवाण हसू होत हे काय झालं कोल्हेच ? मला काही कळेना इतक्यात तो जवळ पोहोचलाच आणि आगदी अजिजी च्या स्वरात बोलू लागला "अरे इतकं मनावर नको घेऊ, मी परत अस नाही करणार, आपण तर मित्र आहोत एकमेकांचे" मला कळेना हे अचानक या कोल्हेचा कुत्रा कसा झाला पण मी असं काही दिसू दिलं नाही चेहऱ्यावर मी ही त्यला म्हणालो कि ठीक आहे आपण मित्रच आहोत त्याला अगदीच हायसं वाटलंय अस दिसलं पुन्हा माझे आभार मानून तो निघून गेला.

माझे मित्र ही आश्चर्य चकित होते कि झाला काय नक्की थोड्या वेळाने बाजूच्या वर्गातील एक मुलगा मला येऊन म्हणाला कि "वाटलं नव्हतं तुझी इतकी ओळख असेल म्हणून कोल्हे ला काय तुडवला तुझ्या पोरांनी साला तू मधल्या सुट्टीतून पोरांना बोलावला कधी " आता माझ्या लक्षात गोष्ट येऊ लागली या कोल्हेने अनेकांशी कॉलेजात पंगा घेऊन ठेवला होता त्यातील कोणीतरी पोर बोलावून कोल्हेला चोपला आणि कोल्हेला वाटलं माझीच पोर ती म्हणून असा शेपूट घालून माझ्याशी बोलत होता. मला गम्मत वाटायला लागली. दुसऱ्या दिवशी कोल्हे पुन्हा भेटला कालच्या सारखाच अजिजी ने बोलत होता त्या पुढे २ वर्ष कोल्हे माझा मित्र बनून राहिला मलाही एक आयता सुरक्षा गडी मिळाला.
mast aahe .... ha tuza kharakhura anubhav aahe na?? .... changla lihitos ki re BABA ....
ReplyDelete