Thursday, 9 June 2011

मर्यादा

व्याख्या द्या असा प्रश्न शाळेत बऱ्याचदा येत असे ...... कसली व्याख्या द्यायची ? तर ज्या संकल्पना शिकवल्या त्याची व्याख्या ... संकल्पनेला अस शब्दात बांधलं की ती संकल्पना बंदिस्त होऊन जाईल मग शब्दाच्या अव्याक्यातच त्या संकल्पनेला समजून घ्यावं लागे ..... शब्दा पल्याड ही काही असेल त्या संकल्पनेत अस कधी तेव्हा वाटलं नाही, कोणी तस वाटू दिलही नाही. सगळं तस आलबेलच होतं शब्दाची, मानवी इतिहासातील सगळ्यात महत्वाच्या शोधाची मर्यादा समजे पर्यंत. पण आयुष्यात अशा काही गोष्टी समोर येत गेल्या की शब्दाने व्यक्त होण्याची मर्यादा अधिकाधिक स्पष्ट पणे जाणवू लागली मग या सगळ्यात सशक्त मध्यमा   व्यतिरिक्त अजून काही आहे का याचा शोध सुरु झाला, या शोधानेही बरीच उत्तरं समोर आली रंग रेषांच, नाद स्वरांच विश्व उलगडलं गेलं पण निश्चित अर्थाची सवय झालेलं मन अस्वस्थच राहिलं.
 आता आयुष्यात चाहु अंगाने अनुभव येऊन आदळत आहेत  मात्र त्यांना स्वतःसाठी समजण्याचाही काही मध्यम नाही याची अस्वस्थ जाणीवहि कायम आहे.


1 comment:

  1. baap re... char vela wachala tevha kalale... bhari aahe ....( samajaylahi....)

    ReplyDelete